ओवी ट्रस्टच्या वतीने मोझर या आदिवासी गावात बालकट्टा आणि चित्रकला साहित्य वाटप

ओवी ट्रस्टच्या वतीने मोझर या आदिवासी गावात बालकट्टा आणि चित्रकला साहित्य वाटप

बालवयातील मुलांना वाचनाची आवड लागावी आणि वाचन संस्कृती रुजवी म्हणून ओवी ट्रस्ट च्या वतीने बालकट्टा हा उपक्रम यवतमाळ जिल्ह्यातील 5 गावामध्ये गेली 6 महिने सुरू आहे. याच कार्यक्रमा अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील मोझर या आदिवासी गावात 7 फेब्रुवारी 2021 रोजी सृजनशील आणि आनंददायी बालकट्टा घेण्यात आला.

सोबतच 3 ते 12 या वयोगटातील 45 विद्यार्थ्यांना चित्रकलेचे साहित्य वाटप करण्यात आले हा कार्यक्रम मोझर गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेत घेण्यात आला. दरम्यान उपस्थित बालकांनी परिसरातील उपलब्ध फुलांनी तयार केलेला गुच्छ भेट देऊन ओवी ट्रस्ट च्या पदाधिकारी यांचे स्वागत केले.

या कार्यक्रमाला ओवी ट्रस्ट च्या अध्यक्षा प्रणाली जाधव ,संचालक धम्मानंद बोंदाडे ,बालमित्र ऋतुजा वरठी ,प्रतीक्षा गोहणे ,सिमरन मानकर ,योग शिक्षक अंकुश चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते .