मुले फक्त शाळेतच शिकतात असे नाही. मुले सतत शिकत असतात. ती कुटुंबातही शिकतात आणि समाजातही शिकत असतात. मात्र पालकांना तसेच समाजातील सर्व नागरिकांना ही जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक असते.हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन पालकांना सजग करण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून “समृद्ध पालकत्वाच्या विचारांची पेरणी करणारी” ओवी समृद्ध पालकत्वाची ही पालक कार्यशाळा माता रमाबाई आंबेडकर महापालिका वसाहत मुंबई येथे 14 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळात पार पडली .ही कार्यशाळा पालकत्व प्रशिक्षक प्रणाली जाधव आणि धम्मानंद या उभयतांनी घेतली .या कार्यशाळेला पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
पालकत्व निभावताना येणारा ताण कमी करण्यासाठी मुले आणि पालक यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करणारी ही कार्यशाळा ठरली.