सध्या ओवी समृद्ध पालकत्वाची या उपक्रमांतर्गत मुंबईत पालकांचं विशेष प्रशिक्षण घेण्यात आलं. यात मुलं एखादी कृती करत असताना पालक म्हणून आपण सतत सूचना दिल्यावर मुलांमध्ये निर्माण होणारी शिक्षणातली नकारात्मक भावना कशी तयार होते आणि त्याचा मुलाच्या शिकण्यावर कसा परिणाम होतो याचा अनुभव चित्रकलेच्या मार्फत पालकांना दिला गेला. पालक चित्र काढत असताना त्यांना नकारात्मक सूचना दिल्यामुळे त्यांना चित्र काढण्यात मजा येत नव्हती. आपण चित्र काढू शकणार नाही ही भावना निर्माण झाली आणि त्यातून आपण मुलांना सतत सूचना दिल्यावर मुलं कोणत्या मानसिक परिस्थितीतून जात असतील याची जाणीव पालकांना झाली.
चित्र या उपक्रमातून ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीचा समजून घेताना पालक. पारंपरिक शिक्षण पद्धतीत सर्व मुलं ही एकाच साचेबद्ध पद्धतीने शिक्षण घेतात, पण मुलांना शिकण्यासाठी स्वतंत्र अवकाश दिला तर मुलांच्या कल्पकतेला चालना मिळतेच आणि सर्जशीलता वाढीस लागते. बालसंगोपनात बाबा पालक यांचं महत्व पटवून देताना धम्मानंद. बालसंगोपन ही केवळ आईची जबाबदारी नसून बाबाची भूमिका ही तितकीच महत्वाची आहे. मूल हे दोघांचं असल्याने दोन्ही पालकांचा तितकाच सहवास आणि प्रेम मिळाले तर मुलांमध्ये भावनिक विकास चांगला होतो आणि शिकण्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.